या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22 हजार रुपये नुकसान भरपाई अधिकृत शासन निर्णय पहा

 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

Dhananajay Munde : राज्यात 2022 मध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विभागिय आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार 1500 कोटी रुपये जिल्हानिहाय वाटपास मंजुरी दिली होती. आणि ज्या जिल्ह्यांना अतिरिक्त निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडून लाभार्थ्यांची डीबीटी प्रणाली द्वारे माहिती 28/02/2024 पर्यंत भरून घ्यावी अशा सुचना दिल्या होत्या.

 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी २०२४ मध्ये अनुक्रमे १४४ कोटी आणि २ हजार १०९ कोटी रुपये दिले आहेत. तसेच जानेवारी ते मे २०२४ दरम्यान अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५९६ कोटी रुपयांचा मदत निधी दिला आहे. परंतु नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने ३०७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी परभणी, वाशिम, अमरावती, अहमदनगर यांच्या कडून अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती. तरी दि. 10/सप्टेंबर रोजी निधी वितरणचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार परभणी, अमरावती, वाशिम, अहमदनगर या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना 2022 चे सततच्या पावसाचे अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना 61 कोटी 16 लाख रुपयांचा निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. हे अनुदान फक्त 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे Dhananajay Munde.

 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Leave a Comment