• धनंजय मुंडे यांनी ३० ऑगस्ट रोजी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा केली होती.
  • २०२३ च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना २ हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी हेक्टरी ५,००० रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती.
  • यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण ४,१९४ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे, ज्यामध्ये कापूस उत्पादकांसाठी १,५४८ कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादकांसाठी २,६४६ कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.
  • तर ज्या शेतकऱ्यांनी २०२३ या खरीप हंगामामध्ये सोयाबीन व कापूस पिकाचे उत्पादन घेतले होते अश्या शेतकऱ्यांना १० सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान हेक्टरी ५,००० रुपये अनुदान बँक खात्यात जमा होणार आहे